News
News
टीव्हीabp shortsABP शॉर्ट्सव्हिडीओ पॉडकास्ट खेळ
X

पार्श्वगायिका पलक मुच्छलला धमकवणारा प्राध्यापक अटकेत

पलक मुच्छलला धमकवल्याप्रकरणी आंबोली पोलिसांनी बुधवारी 30 वर्षीय आरोपी प्राध्यापक राजेश कुमार शुक्ला याला बेड्या ठोकल्या.

FOLLOW US: 
Share:
मुंबई : बॉलिवूडमधील प्रसिद्ध पार्श्वगायिका पलक मुच्छलला धमकावणाऱ्या व्यक्तीला अटक करण्यात आली आहे. मुंबईतील आंबोली पोलिसांनी बुधवारी 30 वर्षीय आरोपी प्राध्यापकाला बेड्या ठोकल्या. आरोपी राजेश कुमार शुक्ला पलक मुच्छलचा चाहता असल्याचं सांगत होता. पलकने आपली भेट घ्यावी, म्हणून तिचा पाठलाग करणं, नजर ठेवणं आणि फोनवरुन धमकी देणं असे सर्व प्रकार त्याने केले. आरोपी राजेश बिहारमधील सासारामचा रहिवासी असल्याचं पोलिसांच्या तपासात समोर आलं. आपल्या आवडीच्या गायकांना भेटण्यासाठी तो मुंबईत आला होता. टेलिफोन डिरेक्टरीतून पलकचा नंबर शोधल्याचा दावा राजेशने केला आहे. पलकला मेसेज केल्यानंतर दोन-तीन वेळा त्याने तिला भेटण्यासाठी फोनही केला होता. आपल्याला न भेटल्यास विनयभंग करण्याची धमकीही आरोपीने दिली होती. पलकने दोन दिवसांपूर्वी आंबोली पोलिसात तक्रार दाखल केली. सुरुवातीला तिने राजेशच्या मेसेजेसकडे दुर्लक्ष केलं, मात्र हे प्रकार वाढल्यामुळे तिने पोलिसात धाव घेतली. पोलिसांनी राजेशचा फोन ताब्यात घेतला असून त्याने इतर पार्श्वगायिकांनाही त्रास दिला आहे का, हे तपासले जात आहे. आशिकी 2, मिकी व्हायरस, आर... राजकुमार, जय हो, किक, बाहुबली, प्रेम रतन धन पायो अशा अनेक चित्रपटात पलकने गाणी गायली आहेत.
Published at : 08 Jun 2018 04:02 PM (IST) Tags: Bollywood Singer professor Bihar Mumbai

आणखी महत्वाच्या बातम्या

Decoding Kalki 2898 AD World : अमिताभ अश्वत्थामा, दीपिका सुम-एटी, 875 वर्षानंतरची अत्याधुनिक टेक्नोलॉजी; डिकोडिंग 'कल्कि 2898 एडी'

Decoding Kalki 2898 AD World : अमिताभ अश्वत्थामा, दीपिका सुम-एटी, 875 वर्षानंतरची अत्याधुनिक टेक्नोलॉजी; डिकोडिंग 'कल्कि 2898 एडी'

Nana Patekar :  सुपरस्टार मीच...,तुझ्याकडे कोणीच पाहणार नाही; नाना पाटेकर अनिल कपूरला असं का म्हणालेले?

Nana Patekar :  सुपरस्टार मीच...,तुझ्याकडे कोणीच पाहणार नाही; नाना पाटेकर अनिल कपूरला असं का म्हणालेले?

Adult Web Series On OTT : फक्त 'मस्तराम'च नाही तर 'या' वेब सीरिजमध्येही हॉट सीन्सचा भडिमार, कुटुंबासह चुकूनही पाहू नका

Adult Web Series On OTT : फक्त 'मस्तराम'च नाही तर 'या' वेब सीरिजमध्येही हॉट सीन्सचा भडिमार, कुटुंबासह चुकूनही पाहू नका

Accident Or Conspiracy Godhra : 'साबरमती ट्रेन जाळली गेली नाही तर जळत ठेवली गेली'; ॲक्सिडेंट ऑर कॉन्स्पिरेसी गोधरा चित्रपटाचा अंगावर शहारा आणणारा ट्रेलर

Accident Or Conspiracy Godhra : 'साबरमती ट्रेन जाळली गेली नाही तर जळत ठेवली गेली'; ॲक्सिडेंट ऑर कॉन्स्पिरेसी गोधरा चित्रपटाचा अंगावर शहारा आणणारा ट्रेलर

Sonakshi Sinha Wedding : सोनाक्षी सिन्हाच्या लग्नात भाऊ लव-कुश गैरहजर, झहीर इक्बालसोबत लग्नाआधी उपस्थित केले होते प्रश्न, म्हणाला 'तिला हे ओळखता येत नाही...'

Sonakshi Sinha Wedding : सोनाक्षी सिन्हाच्या लग्नात भाऊ लव-कुश गैरहजर, झहीर इक्बालसोबत लग्नाआधी उपस्थित केले होते प्रश्न, म्हणाला 'तिला हे ओळखता येत नाही...'

टॉप न्यूज़

Mumbai Crime: परळच्या प्रसिद्ध मेडिकल शॉपच्या मालकाला 'सीबीआय' अधिकाऱ्याचा फोन, घाबरुन 1.30 कोटी देऊन टाकले अन्...

Mumbai Crime: परळच्या प्रसिद्ध मेडिकल शॉपच्या मालकाला 'सीबीआय' अधिकाऱ्याचा फोन, घाबरुन 1.30 कोटी देऊन टाकले अन्...

महायुतीच्या गोटात शिजतंय काय? मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांची रात्री उशीरा दीड तास वर्षावर खलबतं

महायुतीच्या गोटात शिजतंय काय? मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांची रात्री उशीरा दीड तास वर्षावर खलबतं

PM Narendra Modi यांनी शब्दाला जागावं आणि लोकसभा उपाध्यक्षपद विरोधकांना द्यावं : सामना

PM Narendra Modi यांनी शब्दाला जागावं आणि लोकसभा उपाध्यक्षपद विरोधकांना द्यावं : सामना

Shivaji Maharaj: महाराष्ट्रात आजघडीला शिवाजी महाराजांची निव्वळ उथळ भक्ती, राजकारणापुरता शिवरायांचा वापर: विजय देशमुख

Shivaji Maharaj: महाराष्ट्रात आजघडीला शिवाजी महाराजांची निव्वळ उथळ भक्ती, राजकारणापुरता शिवरायांचा वापर: विजय देशमुख